ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र, जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता. मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो; ते जिवंतच अधोलोकात उतरले जावोत, कारण त्यांच्या घरात, त्यांच्या आत्म्यात दुष्टपणा आहे. मी तर परमेश्वराचा धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील. संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी मी वेदनांनी आरोळी देईन आणि ते माझी वाणी ऐकतील. जरी माझे बरेच विरोधक तिथे होते, जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते, तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात. परमेश्वर प्राचीन काळापासून राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत— ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील, कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे. त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते. तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही. परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना नाशाच्या गर्तेत लोटून द्याल; खुनी आणि लबाड लोक त्यांचे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 55 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 55:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ