स्तोत्रसंहिता 5:3-8
स्तोत्रसंहिता 5:3-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन. खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस. गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो. खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो. पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.
स्तोत्रसंहिता 5:3-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो. तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो; दुष्टांचे तुम्ही स्वागत करीत नाही. तुमच्या उपस्थितीत गर्विष्ठ उभे राहू शकत नाही. अनीतीने वागणार्या सर्वांचा तुम्हाला वीट आहे. खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता. खुनी आणि कपटींचा याहवेहला तिरस्कार आहे. परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो. याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.
स्तोत्रसंहिता 5:3-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणार्याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.