YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 5

5
स्तोत्र 5
संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या,
माझ्या विलापाकडे लक्ष द्या.
2हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा,
माझ्या रडण्याकडे कान द्या,
कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो.
3याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता;
सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो
व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.
4तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो;
दुष्टांचे तुम्ही स्वागत करीत नाही.
5तुमच्या उपस्थितीत
गर्विष्ठ उभे राहू शकत नाही.
अनीतीने वागणार्‍या सर्वांचा तुम्हाला वीट आहे.
6खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता.
खुनी आणि कपटींचा
याहवेहला तिरस्कार आहे.
7परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे,
मी तुमच्या भवनात येईन;
अत्यंत आदराने तुमच्या
पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो.
8याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा,
माझ्या शत्रूंमुळे—
माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.
9त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही;
त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे.
त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे;
त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.
10परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा!
त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो.
त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या,
कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.
11परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत;
त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या.
तुम्ही त्यांचे रक्षण करता,
ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.
12याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता;
तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन