स्तोत्रसंहिता 46:9-11
स्तोत्रसंहिता 46:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
स्तोत्रसंहिता 46:9-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात. ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.” सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला
स्तोत्रसंहिता 46:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो. “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.” सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)