तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.
“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”
सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
(सेला)