स्तोत्रसंहिता 42:8-11
स्तोत्रसंहिता 42:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल. मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू? “तुझा देव कुठे आहे?” असे बोलून माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात. हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.
स्तोत्रसंहिता 42:8-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो. मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?” माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
स्तोत्रसंहिता 42:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?” “तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.