YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 42:8-11

स्तोत्रसंहिता 42:8-11 MRCV

तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्‍या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो. मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?” माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.