स्तोत्रसंहिता 37:4-9
स्तोत्रसंहिता 37:4-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील. तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील. परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको. रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो. कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
स्तोत्रसंहिता 37:4-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. दुष्कर्म करणार्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.