स्तोत्रसंहिता 35:1-8
स्तोत्रसंहिता 35:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मला विरोध करणार्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्यांशी लढ. ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा. भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली. त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.
स्तोत्रसंहिता 35:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत.
स्तोत्रसंहिता 35:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा. तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा. माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.” जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची तुम्ही धूळधाण करा; त्यांना मागे फिरवा आणि त्यांना लज्जित करा. वार्याने उडणार्या भुशाप्रमाणे, याहवेहचा दूत त्यांना उडवून लावो; त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा, याहवेहचा दूत त्यांचा पाठलाग करो. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे. सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो— त्यांनी लावलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत.