YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 23:1-6

स्तोत्रसंहिता 23:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

स्तोत्रसंहिता 23:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.

स्तोत्रसंहिता 23:1-6

स्तोत्रसंहिता 23:1-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 23:1-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 23:1-6 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा