YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 23

23
परमेश्वर माझा मेंढपाळ
दाविदाचे स्तोत्र.
1परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
2तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो.
3तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.
4मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
5तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
6खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन