स्तोत्रसंहिता 23:1-4
स्तोत्रसंहिता 23:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचास्तोत्रसंहिता 23:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचा