स्तोत्रसंहिता 22:3-5
स्तोत्रसंहिता 22:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 22 वाचास्तोत्रसंहिता 22:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 22 वाचा