स्तोत्रसंहिता 22:27-31
स्तोत्रसंहिता 22:27-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.
स्तोत्रसंहिता 22:27-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील. कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल. त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील. तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.