YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 22:14-31

स्तोत्रसंहिता 22:14-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस. कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर. तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव. सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव, रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास. मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन. अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा. कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला. महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन. दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा. दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील. कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल. त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील. तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.

स्तोत्रसंहिता 22:14-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. “कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात. त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात. परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव. सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले. परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन. गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

स्तोत्रसंहिता 22:14-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे. माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे. मला कुत्र्यांनी वेढले आहे, दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे; त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे. माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात. परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या. तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा. सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा. मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन. जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा. कारण त्यांनी दुःखितांचे दुःख, तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही; त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला. महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन. नम्र लोक खातील आणि तृप्त होतील; जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील. तुमची हृदये सर्वदा सजीव असो! सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील. कारण याहवेहचेच राज्य आहे आणि सर्व राष्ट्रांवर तेच अधिपती आहेत. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील; जे लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत व धुळीस मिळणारे प्रत्येक त्यांच्यासमोर गुडघे टेकतील. येणारी संपूर्ण पिढी त्यांची सेवा करेल; पुढच्या पिढीला ती प्रभूच्या अद्भुत कृत्यांबद्दल सांगेल. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील, आणि न जन्मलेल्या पिढीला त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.