स्तोत्रसंहिता 145:3-7
स्तोत्रसंहिता 145:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील. ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन. ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
स्तोत्रसंहिता 145:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन. ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.