स्तोत्रसंहिता 145:1-21
स्तोत्रसंहिता 145:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील. ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन. ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील. ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील. हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो. माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.
स्तोत्रसंहिता 145:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन. प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन. याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे. तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात. ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन. ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन. ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील. याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत. याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते. याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल, आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील. ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील. जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल. कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात. याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात. सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता. तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता. याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत. जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात. त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात: जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात, परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील. माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल. प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे युगानुयुग गौरव करोत.
स्तोत्रसंहिता 145:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन. ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णन करतात, आणि तुझा पराक्रम कथन करतात; ह्यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणार्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणार्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.