स्तोत्रसंहिता 136:23-26
स्तोत्रसंहिता 136:23-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्रसंहिता 136:23-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली, त्यांची करुणा सनातन आहे. आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे. ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे. स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.
स्तोत्रसंहिता 136:23-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हांला आमच्या शत्रूंपासून सोडवले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.