स्तोत्रसंहिता 121:3-7
स्तोत्रसंहिता 121:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 121:3-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत. याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत. दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही. याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील— आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
स्तोत्रसंहिता 121:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.