स्तोत्र. 121:3-7
स्तोत्र. 121:3-7 IRVMAR
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.

