YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:33-64

स्तोत्रसंहिता 119:33-64 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. तू आपले भय धरणार्‍यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे. परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्‍चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही. दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो. तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव.

स्तोत्रसंहिता 119:33-64 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही. मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत. ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते; गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही. हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो. दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो. ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत. हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो. हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत. परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे. मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर; मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही. दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो. तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे. हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.

स्तोत्रसंहिता 119:33-64 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे. मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन. तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात. मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा; तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील. लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा, कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत. तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा. हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो; मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो. तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे. मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन. मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत. तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही. तुमच्या नियमात माझा आनंद आहे, कारण ते मला प्रिय आहेत. मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन. तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे; माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते. गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही. याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते. संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत. मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत. हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन. तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे. याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात; तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे. पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा. माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत. मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन. दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही. मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन. माझी मैत्री त्या सर्वांशी आहे, जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात. हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा.