YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:32-45

स्तोत्रसंहिता 119:32-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. तू आपले भय धरणार्‍यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.

स्तोत्रसंहिता 119:32-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.

स्तोत्रसंहिता 119:32-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे, कारण तुम्ही माझी समज विस्तृत केली आहे. हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे. मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन. तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात. मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा; तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील. लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा, कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत. तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा. हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो; मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो. तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे. मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन. मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.