YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 119:32-45

स्तोत्र. 119:32-45 IRVMAR

मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.