स्तोत्रसंहिता 115:1-8
स्तोत्रसंहिता 115:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस. ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो. राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत. त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही. त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही. त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही. जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
स्तोत्रसंहिता 115:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो. इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?” आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत; त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात. पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत. त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत. त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही. त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही. मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.
स्तोत्रसंहिता 115:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. “ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही; त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही; त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.