स्तोत्रसंहिता 115:1-8
स्तोत्रसंहिता 115:1-8 MRCV
आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो. इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?” आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत; त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात. पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत. त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत. त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही. त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही. मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.

