स्तोत्रसंहिता 112:5-8
स्तोत्रसंहिता 112:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
स्तोत्रसंहिता 112:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात. निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
स्तोत्रसंहिता 112:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील. तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.