YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 11:1-7

स्तोत्रसंहिता 11:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार? परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.

स्तोत्रसंहिता 11:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,” कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी. जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार? परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात. याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात. जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील. कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

स्तोत्रसंहिता 11:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी परमेश्वराचा आश्रय केला आहे; तर मग तुम्ही माझ्या जिवाला असे का म्हणता की, “तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा? कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत; आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार?” परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात. परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल.