स्तोत्रसंहिता 105:1-4
स्तोत्रसंहिता 105:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 105 वाचास्तोत्रसंहिता 105:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 105 वाचा