स्तोत्रसंहिता 105:1-4
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
स्तोत्रसंहिता 105:1-4