स्तोत्रसंहिता 104:5-7
स्तोत्रसंहिता 104:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही. तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत. तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचास्तोत्रसंहिता 104:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही. तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले. परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचास्तोत्रसंहिता 104:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस, पर्वतांवर जले स्थिर राहिली; तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचा