YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 104

104
देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो
उत्प. 1:1-31
1हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस;
तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
2जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस;
तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.
3तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो;
तू मेघांना आपले रथ करतोस;
तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस.
4तू वाऱ्याला आपले दूत करतोस,
अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस
5त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे,
आणि ती कधीही हलणार नाही.
6तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस;
पाण्याने पर्वत झाकले आहेत.
7तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे;
तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.
8ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली,
त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली.
9तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही;
ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत.
10तो दऱ्यातून झरे वाहवितो;
डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.
11ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात;
रानगाढवे आपली तहान भागवितात.
12नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात;
ते फांद्यामध्ये बसून गातात.
13तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो.
पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे.
14तो गुरांढोरासाठी गवत उगवतो,
आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो;
यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
15तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस,
त्याचा चेहरा चमकविणारे तेल,
आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.
16परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू
त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत;
17तेथे पक्षी आपली घरटी बांधतात.
करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो.
18रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात;
खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
19त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे;
सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.
20तू रात्रीला काळोख करतोस,
तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात.
21तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात,
आणि देवाकडे आपले अन्न मागतात.
22जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात,
आणि आपल्या गुहेत झोपतात.
23दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात,
आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात.
24हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत!
ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत;
पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे.
25त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे,
त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत.
26तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात
आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
27योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे
म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात.
28जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात;
जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते.
29जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात;
जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात.
30जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात,
आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.
31परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो;
परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो.
32तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते;
तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात.
33मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन.
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
34माझे विचार त्यास गोड वाटो;
परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
35पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत,
आणि दुष्ट आणखी न उरोत.
हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
परमेश्वराची स्तुती करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 104: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन