स्तोत्रसंहिता 104:25-28
स्तोत्रसंहिता 104:25-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत. तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे. योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात. जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचास्तोत्रसंहिता 104:25-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहानमोठे असंख्य जलचर विहार करतात. पाहा, त्यात गलबते चालतात, त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला लिव्याथान1 तेथे आहे. तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात; तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचा