स्तोत्रसंहिता 100:2-4
स्तोत्रसंहिता 100:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत. त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
स्तोत्रसंहिता 100:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा. याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत. उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
स्तोत्रसंहिता 100:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.