नीतिसूत्रे 4:7-10
नीतिसूत्रे 4:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव. ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील. ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.” माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
नीतिसूत्रे 4:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव. तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल; ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल, आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.” माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
नीतिसूत्रे 4:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील; ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.” माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल.