नीतिसूत्रे 4:23-24
नीतिसूत्रे 4:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो. वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते. सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा