नीतिसूत्रे 4:11-13
नीतिसूत्रे 4:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे. जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस. शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो. जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस. बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा