नीतिसूत्रे 28:15-28
नीतिसूत्रे 28:15-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्या अस्वलासारखा आहे. ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस. सरळ मार्गाने चालणार्याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो. जो आपली शेती स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही. तोंड पाहून वागणे बरे नाही, चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील. दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्याचेच शेवटी आभार मानतात. जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्याचा सोबती होय. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात. दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात, त्यांचा नायनाट झाला म्हणजे नीतिमान वृद्धी पावतात.
नीतिसूत्रे 28:15-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे. जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो. जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही. जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो. जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते. विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील. कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही. जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल. जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे. लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते. जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो. जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील. जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात, पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात.
नीतिसूत्रे 28:15-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो. जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल. मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये. जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल. जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही. पक्षपात करणे हे चांगले नाही— तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो. कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल. जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्याचा भागीदार आहे. लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल. स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील. जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील. जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात; परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात.