असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो. जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल. मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये. जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल. जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही. पक्षपात करणे हे चांगले नाही— तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो. कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल. जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्याचा भागीदार आहे. लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल. स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील. जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील. जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात; परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात.
नीतिसूत्रे 28 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 28:15-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ