YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 12:1-14

नीतिसूत्रे 12:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे. परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो. दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही. सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे. नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो. दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात. दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो. जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा. नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो, पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते. जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते, पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे. दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो, पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते. दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो, पण नीतिमान संकटातून निसटतो. मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 12 वाचा

नीतिसूत्रे 12:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय. नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात. दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे. नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो. दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते. दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो. स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे. नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात. जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात. दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते. दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो. ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.

सामायिक करा
नीतिसूत्रे 12 वाचा

नीतिसूत्रे 12:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्‍याला तो दोषी ठरवतो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. सद्‍गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील. दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु नीतिमानांचे घर टिकते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो. जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा. नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते. जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय. दुष्ट लोकांना मिळणार्‍या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते. मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो. आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 12 वाचा