फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7
फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतिसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धिच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.