YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-5

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा. आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभुमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा. मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभुमध्ये एकमनाचे व्हा. होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्‍यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत. प्रभुमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा. तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू जवळ आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून प्रियजनहो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा. मी युवदीयेला व संतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूमध्ये एकचित्त व्हा. तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.