गणना 7:1-11
गणना 7:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपवले आणि तो मंडप व त्यातील सर्व सामान हे तैलाभ्यंग करून पवित्र केले, आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीसुद्धा तैलाभ्यंग करून पवित्र केली; तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती; त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे : आच्छादलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा-दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल; त्यांनी ती निवासमंडपासमोर सादर केली. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या-त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे.” तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले. गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले. मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते. पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती. वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”
गणना 7:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले. त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते. त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या. मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.” मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले. त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती. परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते. मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
गणना 7:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली. मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्यामागे एक बैल आणि दोन पुढार्यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले. याहवेहने मोशेला म्हटले, “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.” तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले. गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते. कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते. जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”