YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 7:1-11

गणना 7:1-11 MRCV

जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली. मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले. याहवेहने मोशेला म्हटले, “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.” तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले. गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते. कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते. जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

गणना 7 वाचा