गणना 28:1-10
गणना 28:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा. आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे. एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे. त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे. दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर. “प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी. नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”
गणना 28:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा. आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे : नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे. एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. आणि हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते. त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस. दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे; सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे. दर शब्बाथ दिवशी एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावीत. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज आणखी हा होमबली दर शब्बाथ दिवशी अर्पावा.