YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 25:1-9

गणना 25:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले. मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले. इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.” मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.” त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते. जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला. तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली. या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.

सामायिक करा
गणना 25 वाचा

गणना 25:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्राएल लोक बआल-पौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला; आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.” तेव्हा मोशे इस्राएलांच्या न्यायाधीशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बआल-पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा.” त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली. ते पाहून अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने मंडळीतून उठून हातात बरची घेतली, आणि तो त्या इस्राएल पुरुषाच्या पाठोपाठ डेर्‍याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतांना, म्हणजे त्या इस्राएल पुरुषाला व त्या बाईला पोटात बरचीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. तरी मरीने चोवीस हजार लोक मेले.

सामायिक करा
गणना 25 वाचा