YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 22:1-14

गणना 22:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला. इस्राएलांनी अमोर्‍यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला. तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता. बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत; म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.” मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे वस्तीस राहा; परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हांला उत्तर देईन;” तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?” बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की, ‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल.”’ देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.” तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, “बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.”

सामायिक करा
गणना 22 वाचा

गणना 22:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला. सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता. मवाबाचा राजा मिद्यानीं लोकांच्या वडीलांना म्हणाला, बैल जसा शेतातले सगळे गवत खाऊन टाकतो तसेच हे लोक आपला नाश करतील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबाचा राजा होता. त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात राहत होता. इथेच बलामचे लोक राहत असत. बालाकाचा निरोप हा होता. एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशातून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ दिला आहे. तर आता ये, मी तुला विनंती करतो, तू या लोकांस माझ्यासाठी शाप दे. कारण ते माझ्यापेक्षा खूप भारी आहेत. कदाचित मी त्यांना मारावयास समर्थ होऊन देशातून घालवून टाकील. कारण मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्यास आशीर्वाद मिळतो. आणि जर एखाद्यास शाप दिलास तर त्यास शाप लागतो. मवाबी वडील आणि मिद्यानी वडील बलामाशी बोलावयास गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामास सांगितले. बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हास सांगेन.” मवाबाचे पुढारी त्या रात्री बलामाबरोबर राहिले. देव बलामाकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?” बलाम देवाला म्हणाला, सिप्पोराचा मुलगा बालाकाने, मवाबाच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे. तो निरोप हा, एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशामधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन. पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत. दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही त्यामुळे मवाबाचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्यास हे सांगितले. ते म्हणाले, बलामाने आमच्याबरोबर यायला नकार दिला.

सामायिक करा
गणना 22 वाचा

गणना 22:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे. इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले. इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला. मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता, त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला: “इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत. तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.” मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले. बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले. परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?” बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे: ‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ” परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.” तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.”