नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला. सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता. मवाबाचा राजा मिद्यानीं लोकांच्या वडीलांना म्हणाला, बैल जसा शेतातले सगळे गवत खाऊन टाकतो तसेच हे लोक आपला नाश करतील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबाचा राजा होता. त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात राहत होता. इथेच बलामचे लोक राहत असत. बालाकाचा निरोप हा होता. एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशातून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ दिला आहे. तर आता ये, मी तुला विनंती करतो, तू या लोकांस माझ्यासाठी शाप दे. कारण ते माझ्यापेक्षा खूप भारी आहेत. कदाचित मी त्यांना मारावयास समर्थ होऊन देशातून घालवून टाकील. कारण मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्यास आशीर्वाद मिळतो. आणि जर एखाद्यास शाप दिलास तर त्यास शाप लागतो. मवाबी वडील आणि मिद्यानी वडील बलामाशी बोलावयास गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामास सांगितले. बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हास सांगेन.” मवाबाचे पुढारी त्या रात्री बलामाबरोबर राहिले. देव बलामाकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?” बलाम देवाला म्हणाला, सिप्पोराचा मुलगा बालाकाने, मवाबाच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे. तो निरोप हा, एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशामधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन. पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत. दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही त्यामुळे मवाबाचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्यास हे सांगितले. ते म्हणाले, बलामाने आमच्याबरोबर यायला नकार दिला.
गण. 22 वाचा
ऐका गण. 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गण. 22:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ