गणना 13:1-3
गणना 13:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते.
गणना 13:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.” तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते.
गणना 13:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह मोशेला म्हणाले, “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.” म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते.