गणना 11:4-6
गणना 11:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे परराष्ट्रीय इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल? मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हास येते. आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
सामायिक करा
गणना 11 वाचागणना 11:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला; आणि इस्राएल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, “आम्हांला खायला मांस कोण देईल? मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.”
सामायिक करा
गणना 11 वाचा