YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 12:31-43

नहेम्या 12:31-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला. होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले, आणि अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम, यहूदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले. काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमाया, शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या. आसाफचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता. झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले. स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले. मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले. मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या. मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते. मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्रह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली. या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.

सामायिक करा
नहेम्या 12 वाचा

नहेम्या 12:31-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी यहूदाच्या सरदारांना कोटावर चढवले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या; त्या स्तोत्रे गात मिरवत चालल्या; त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे उकिरडावेशीकडे चालली; आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी, अजर्‍या, एज्रा, मशुल्लाम, यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया, व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्‍या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ, आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला; ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्‍यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले. स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत, आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले. अशा प्रकारे स्तोत्रे म्हणणार्‍या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या; मी व माझ्याबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले; याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्‍या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले; आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता. त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.

सामायिक करा
नहेम्या 12 वाचा